ग्लुकॅगॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. हे संप्रेरक स्वादुपिंडाच्या अल्फा पेशींमध्ये तयार होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास हे हार्मोन स्रवते. हे हार्मोन स्रवणे सुरू झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे हार्मोन यकृतातील ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते. थोडक्यात याचे काम इन्सुलिनच्या विपरीत आहे