ग्लायवित्झचा हल्ला
ग्लायवित्झचा हल्ला हा जर्मनीच्या नाझी सैनिकांनी पोलंडच्या सैनिकांचा वेश धारण करून ऑगस्ट ३१, इ.स. १९३९ रोजी जर्मनीच्या अपर सिलेसिया प्रांतातील ग्लायवित्झ येथील रेडियो केन्द्रावर चढवलेला हल्ला होता.
या हल्ल्याद्वारे पोलंडने जर्मनीवर आक्रमण केल्याची सबब सांगून लगेचच जर्मनीने पोलंडवर पूर्ण शक्तीनिशी चढाई केली व दुसऱ्या महायुद्धास येथून तोंड फुटले