ग्रँड हयात गोवा

(ग्रँड हयात गोवा हॉटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रँड हयात गोवा हे भारत देशाच्या गोवा राज्यातील बांबोळी येथील पंचतारांकित हॉटेल आहे.

हॉटेलची इमारत

संपादन

या हॉटेलच्या इमारतीचा आराखडा १९९० मध्येच तयार असला तरी याचे बांधकाम १९९५ मध्ये डायनॅमिक्स ग्रुपने सुरू केले. त्यानंतर जीबी ग्रुपने याची मालकी घेतली परंतु त्यांच्यांत मालमत्तेबद्दल देशपातळीवर वादविवाद निर्माण झाल्याने या हॉटेलचे बांधकाम कांही वर्षे थांबले. २००५ च्या मध्यात बांधकाम पुन्हा सुरू झाले. २२ डिसेंबर २००९ रोजी डीबी ग्रुपने हयात इंटरनॅशनल या संस्थेशी भारतात ५ हयात हॉटेले उघडण्याच्या करारावर सही केली. []

उत्तर गोव्यात असलेले हे हॉटेल २८ एकर जमिनीवर आहे. इमारतीच्या बांधकामाचा खर्च त्यावेळी ५५० कोटी रुपये आला. ३१२ खोल्यांचे हे हॉटेल भारतात आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे समजले जाते.[ संदर्भ हवा ]

इतिहास

संपादन

या हॉटेलची जागा गोवा येथील सिनारिस या कुटुंबाची होती. या जमिनीवर खूप प्रमाणात नारळाची झाडे आणि इतर फळांची झाडे होती. डायनॅमिक्स ग्रुपने गोवा रियल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या मदतीने १९९२-९३मध्ये त्या जमिनीची खरेदी केली.

या जागेचे दक्षिण बाजूस एक चर्च आणि एक क्रॉस होता. बांधकाम करताना या गोष्टी तशाच ठेवल्या गेल्या. चर्चला कोणताही धोका पोचू नये तसेच ते कायम टिकून राहावे यासाठी सध्या नियोजन चालू आहे. हे हॉटेल आधीपासून असलेल्या फळांच्या झाडांनी तसेच केळीच्या बागांमध्ये बांबोलिम बे वर आहे. या जागेच्या मालकांचा एक लहानसा बंगला पाडून त्यांच्यासाठी एका वेगळ्या जागेत नवीन बंगला बांधला आहे. तेथील मूळ भाडेकरूंना तेथील जमिनीचे प्लॉट आणि आर्थिक भरपाई देऊन त्यांना नवीन घरे बांधण्यास मदत केली गेली.

हॉटेलच्या इमारतीमधील शिल्पकला १७ व्या शतकातील पोर्तुगीज शिल्पकलेवर आधारित आहे. इमारतीचे आराखडे शिल्पकार चंद्रशेखर कानेटकर, इंग्लंडचे जीए इंटिरियर डिझायनर व इंडोनेशियाच्या इंत्रान इंक यांनी केले.

१ ऑगस्ट २०११ रोजी हे हॉटेल ग्रँड हयात गोवा या नावाने सुरू झाले.

सुविधा

संपादन

या हॉटेलमध्ये समुद्र किनाऱ्याचा देखावा सहज पाहता येईल अशा विशाल खोल्या असून, पोहण्याच्या तलावाचा देखावा पाहता येतील अश्याही खोल्या आहेत. सर्व खोल्यांतून तिजोरी, टेलिफोन, इस्त्री, वर्तमान पत्र या सुविधा आहेत.[]

जेवण कक्ष : जेवणाच्या खोलीत थाई, इंडियन, इटालियन, मध्य पूर्वेतील असे दहा हजार प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.[ दुजोरा हवा] अतिथि कधी कधी खास जेवणाची स्वतंत्र आरक्षण व्यवस्था मागू शकतात, तसेच मोकळ्या जागेवरही आहाराचा आस्वाद घेऊ शकतात.

व्हेरांदा : या आधुनिक पद्धतीच्या उपहारगृहात बसून जेवताना त्याच्या जाळीतून बाजारातील राहदारी तसेच बांबोलिम बे (बांबोळीची चौपाटी) न्याहाळता येतो. या उपहारगृहात ताज्या भाज्या, सीफूड व अन्य मांसाहारी पदार्थ पुरविले जातात. गोव्यामधील हे उपहारगृह चांगले समजले जाते.

कॅफेटेरिया : येथे घरगुती प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. तसेच उच्चतम अल्पोपहार, न्याहारी आणि गोड पदार्थ मिळतात. एका देखण्या टेबलावर विविध स्वादिष्ट आणि गोड पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. चॉकोलेटे, बिस्किटे व हंगामी विशेष खाद्यपदार्थ यांची येथे किरकोळ विक्री होते.

काफिज बार : हा बार एक मनोरंजनाचे ठिकाण आहे. संध्याछायेत परिवारासह आनंद लुटता येणे हे याचे वैशिष्ट्य आहे. येथील मोकळ्या जागेतील आल्हाददायक बैठका मनाला तजेला देतात.

पूल बार आणि ग्रिल

संपादन

समुद्राकाठच्या पुळणीपासून ५० मीटरच्या अंतरावरच हा लहान जलाशय बार आणि ग्रिल आहे. येथे कॉकटेल्स पुरविली जातात. लोखंडी सळीवर भाजलेले स्वादिष्ट पदार्थ, हलके फुलके सॅलड्स आणि घरगुती आइस्क्रीम येथे दिवसभर पुरवली जातात.

चूल्हा

संपादन

हे घरगुती पद्धतीचे भारतीय उपहारगृह आहे. येथे स्वयंपाक व्यवस्था प्रादेशिक आणि तंदूर पद्धतीची आहे. तंदूरमध्ये कांबेवर भाजून मटण, मासे, भाज्या, ह्या ग्रामीण पद्धतीने बनविलेल्या गोष्टी तांब्याच्या ताटात आणि कोंबडीचे पदार्थ मातीच्या पात्रात पुरविले जातात. रात्रीच्या जेवणासाठी किंवा मेजवानीसाठी हीच पद्धत वापरली जाते.

बे व्ह्यू लाउंज

संपादन

दिवसा समुद्र किनाऱ्यावरील स्थितीचे आरामदायी कोचावर आडवे होऊन निरीक्षण करणे आणि रात्री मध्यवर्ती ठिकाणावरून सागराच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या विविधरंगी पाण्याच्या लाटांचे अवलोकन करून अचंबित होणे, हे या लाउंजचे वैशिष्ट्य आहे. .

हॉटेल परिसर आणि हॉटेलमधील सुविधा

संपादन

या हॉटेलमध्ये वायफाय, वातानुकूलन, २४ तास स्वागत कक्ष, उपहारगृह, बार, कॅफे, रूमसेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, लहान जलाशय, जिम या सुविधा आहेत. तसेच व्यवसाय केंद्रात ऑडिओ व्हिज्युअल इक्विपमेंट, LCD प्रोजेक्टर, सभागृह, मुलांचे खेळ, स्पा, ब्यूटी सलून, हेल्थ क्लब, मसाज केंद्र, पोहण्याचा तलाव, सौना, प्रवासीसेवा मेज, वाहनतळ, परिवहन सेवा, व्हॅले पार्किंग, इत्यादी सुविधा आहेत.

हे हॉटेल पणजी या राजधानी शहरापासून सात किलोमीटरवर आहे. मंगेशीचे मंदिर, नेव्हल एव्हिएशन संग्रहालय आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस या स्थानिक गोष्टी पर्यटकांसाठीची आकर्षणे आहेत.

या हॉटेलपासून दाभोळी विमानतळ २५ किमीवर आहे तेथे पोहण्यासाठी केवळ ३५ मिनिटे पुरेशी आहेत. थिवीम रेल्वे स्थानक येथून २८ किलोमीटरवर आहे तेथे पोहचण्यास ४० मिनिटे लागतात.

पुरस्कार

संपादन
  • या हॉटेलला सन २०१२ मध्ये ८, २०१३ साली ५, तर २०१४ साली २ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत “Conde Nast Travellar (US)” यांचे बेस्ट न्यू हॉटेल, बेस्ट न्यू स्पा, फेव्हरिट न्यू हॉटेल इंडिया[], या पुरस्कारांचा समावेश आहे.
  • शिवाय इतर पुरस्कारांमध्ये “Best Luxury Family hotel” हा सर्वात वरच्या दर्जाचा जागतिक आराम हॉटेल अवॉर्डही मिळाला आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ग्रँड हयात गोवा". 2015-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "ग्रँड हयात गोवा सुविधा". २१ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "ग्रँड हयात गोवा कोंडे नास्ट ट्रॅव्हलर कड़ून 'भारतात बेस्ट नवीन हॉटेल ने पुरस्कृत". 2015-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.