गोविंद वासुदेव कानिटकर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर (जन्म : पुणे, ९ जानेवारी १८५४; - पुणे, ४ जून १९१८) हे मराठी कवी व भाषांतरकार होते.

गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म नाव गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म जानेवारी ९, १८५४
पुणे
मृत्यू जून ४, १९१८
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, अनुवाद

कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.

गोविंद वासुदेव कानिटकर यांची ग्रंथसंपदासंपादन करा

  • अकबरबादशाह (दीर्घकाव्य -१८७९)
  • श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध (दीर्घकाव्य -१८७८).
  • संमोहलहरी (दीर्घकाव्य -१९००)
  • कविकूजन (स्फुट कवितांचा संग्रह -१९३३). हा संग्रह् कानिटकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी प्रकाशित करवला. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कानिटकरांचे अल्प चरित्रही आहे.

गो.वा. कानिटकरांची भाषांतरित पुस्तकेसंपादन करा

  • गीतांजली (१९१३. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद). हे पुस्तक अनुवादाचा आदर्श नमुना समजले जाते.
  • भट्ट मोक्षमुल्लरकृतधर्मविषयक व्याख्याने (१८८३. मॅक्समुल्लरच्या Origin and Growth of Religion चे मराठी भाषांतर)
  • वीरसेन किंवा विचित्रपुरीचा राजपुत्र (१८८३. शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’ नाटकाचा अनुवाद)
  • याशिवाय शेक्सपियरच्या ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे मराठी अनुवाद
  • स्त्रियांची परवशता (१९०२. जॉन स्ट्युअर्ट मिलच्या Subjection of Women चे भाषांतर)

संकीर्णसंपादन करा

कानिटकर हे १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.