गोरखमुंडी
(गोऱखमुंडी या पानावरून पुनर्निर्देशित)
गोरखमुंडी किंवा मुंडीगोरखमुंडी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही भारतभर भातशेती सारख्या सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते.
ही वनस्पती साधारण ३० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. खोड व फांद्या दंडगोलाकार, दातेरी, गाठी असलेल्या आणि केसाळ असतात. पाने अवृंत अधोगामी व फुले संयुक्त असून लंबवर्तुळाकार असतात. फुले नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येतात.
- कानडी नाव : करंदा-गीडा :
- गुजराती नाव : नदानीमुंडी, बोडियोकलार
- तमिळ नाव : विष्णूकरन्तै
- फारसी नाव : सखिमि-इ-ह्यत्
- बंगाली नाव : मुंडीरी, थुलकुडी
- मराठी नाव : मुंडी, बोंडथरा, बरसबोंडी
- संस्कृत नाव : अरुणा, कुंभला, तपोधना, प्रव्राजिता, भिक्षु, महामुंडी, मुंडतिक्ता, मुण्डी, श्रावणी
- शास्त्रीय नाव : स्फीरॅंथस इंडिकस
- हिंदी नाव : छोटी मुण्डी, गोरखमुंडी
गोरखमुंडी ही उष्ण आहे आणि चवीला कडू अशी आहे.
आयुर्वेदीय मतानुसार
संपादन- गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो.
- ह्या वनस्पतीच्या पानांचा रस जठराच्या विकारांवर उपयोगी आहे.
- बियांची आणि मुळांची पूड कृमिसारक असून मुळांचा अर्क छातीच्या दुखण्यावर,.खोकल्यावर आणि मलाशयाच्या तक्रारींसाठी गुणकारी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |