गोरखगड

nath panti temple & tracking place.
(गोरक्षगड या पानावरून पुनर्निर्देशित)


गोरखगड किंवा °गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे.

गोरखगड
गुणक 19°11′31″N 73°32′24″E / 19.191866°N 73.540077°E / 19.191866; 73.540077
नाव गोरखगड
उंची ६५१ मीटर/२१३७ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव खोपिवली , देहरी.
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. खोपिवली या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत. २१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते.[]

स्वरूप

संपादन

खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर, शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. गडावरील काहीसा भाग जंगलातील आहे , त्यामुळेच सर्वच वातावरण थंड होऊ जात. गडावर कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या आहे . सभोवताल परिसर हा निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो. किल्ल्यावरून खालील परिसर हा विलक्षण दिसतो []

संदर्भ

संपादन
  1. ^ a b टेटविलकर, सदाशिव (2017-12-25). दुर्गयात्री. BRONATO.com.