गोखरू

(गोखरु या पानावरून पुनर्निर्देशित)

सराटा किंवा काटे गोखरू[] (शास्त्रीय नाव: Tribulus terrestris (ट्रिबुलस टेरेस्ट्रिस), (हिंदी: गोखरू), (संस्कृत: गोक्षुर), इंग्रजी:land caltrops लॅंड कॅलट्रॉप्स) ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरुवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढऱ्या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. सराट्याची मुळे पांढऱ्या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात.

सराट्याचे झाड

लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत.

विविध भाषांतील नावे

संपादन
  • इंग्रजी : Land caltrops'
  • कानडी : नेगलू
  • गुजराती : बेटा-नाना गोखरू
  • तमिळ : नैरिंची
  • फारसी : तुखमेखार
  • बंगाली : गोखरी
  • मराठी : सराटा, गोखरू
  • शास्त्रीय नाव : ट्रिबुलस टेरेस्ट्रिस
  • संस्कृत : इक्षुगंधा, कण्टकत्रिक, कण्टफल, गोकण्ट(क), गोक्षुर(क), त्रिकण्टक, पलंकषा, वनशृंगाट, श्वदंष्ट्रा, षडंग, स्वादुकण्टक, क्षुद्रकण्टक
  • हिंदी : छोटा गोखरू, गोक्षी, हुस्सुक

गोखरूसाठीच्या अमरकोशातील ओळी

संपादन

पलंकषा त्विक्षुगन्धा श्वदंष्ट्रा स्वादुकण्टकः ॥ - अमरकोश २.४.९८चा उत्तरार्ध
गोकण्टको गोक्षुरको वनशृंगाट इत्यपि । - अमरकोश २.४.९९चा ्पूर्वार्ध.

आयुर्वेदिक उपयोग

संपादन

किडनी ट्रान्सप्लान्ट : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करून पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.[]

गोखरूपासून बनवलेली व बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधे

संपादन
  • गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहर कषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे.

चित्र दालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "गोखरू".
  2. ^ अनेक लोगों का डायलिसिस रुकवा चुका है ये प्रयोग. http://onlyayurved.com. ०९/१२/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |website= (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन