गेरोनाची लढाई ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. २४ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या वेढ्यात स्पेनचा विजय झाला. गेरोना शहराला वेढा घालून बसलेल्या फ्रेंच सैन्यावर कॉंदे दे काल्दागेसने हल्ला केल्यावर फ्रेंचांनी हा वेढा उठवला व बार्सेलोनाकडे कूच केली