गॅस्ट्रोस्कोपी
अन्ननलिका,जठर,आद्यांत्र(Duodenum) यांच्या एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणाऱ्या तपासणीस गॅस्ट्रोस्कोपी(Esophagogastroduodenoscopy) म्हणतात.
तपासणीसाठी लक्षणे
संपादन- वारंवार होणारा पित्ताचा त्रास,
- अन्नग्रहण केल्यानंतर छातीत होणाऱ्या वेदना,
- भोजनानंतर ढेकरा बरोबर अन्नाचे अंश येणे,
- संडासच्या तपासणीमध्ये रक्ताचे अंश आढळणे,
- जठराचा कर्करोग,
- जठराच्या झडपांची तपासणी,
- जठराची सुज,
- आद्यांत्रमधील सुज किंवा अडथळे,
- स्वादुपिंडचे काही आजार,
- रक्ताच्या उलट्या होणे,
- कारण स्पष्ट नसताना आढळणारे रक्तपांढरी
- बेरियम मील तपासणी काही आक्षेपार्ह आढल्यास,
- अन्ननलिकेतील दोष,
- अन्ननलिकेतील वाढलेल्या रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया,
- अन्ननलिकेत अडकलेल्या वस्तु काढण्याकरिता.