गूढ कल्पनेवर आधारित कथेला 'गूढकथा' असे म्हणतात. रत्नाकर मतकरी यांनी मराठीत गूढकथा हा वाङ्मयप्रकार लोकप्रिय केला. कबंध,खेकडा, गहिरे पाणी, निजधाम, निर्मनुष्य हे मतकरी यांचे गूढकथा संग्रह प्रसिद्ध आहेत. नारायण धारप यांनीही उत्कृष्ट गूढकथा लिहिल्या. त्यांनी निर्मिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा अतिशय गाजल्या. अनोळखी दिशा, अघटित, चेटकीण, भयकथा, मृत्युद्वार, मृत्युजाल हे नारायण धारप यांचे गूढकथा संग्रह प्रसिद्ध आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.