गुस्ताव व्हाईटहेड याचे मुळचे नाव गुस्ताव वेसकॉफ होते. त्याने जर्मनीतुन अमेरिकेत स्थलांतर केल्यावर व्हाईटहेड हे नाव धारण केले.त्याने एक विमाननिर्मिती केली व १४ ऑगस्ट १९०१ या दिवशी त्याने त्या विमानात बसुन उड्डाण केले.या विमानाचे नाव त्याने द कॉंडार असे ठेवले होते.तेथल्या फेअरफिल्ड या जागेत, त्याने, हे विमान त्याने ५० फुट उंचीवर नेउन त्याद्वारे त्याने सुमारे दोन किमी प्रवासही केला,असा दावा करण्यात आलेला आहे.अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील कनेक्टिक नावाच्या राज्याने विधानसभेत अश्या आशयाचा ठराव पारित केला आहे. []

गुस्ताव व्हाईटहेड

संदर्भ

संपादन