पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे गुंजवणी नदीचे खोरे. याच गुंजन मावळात राजगड किल्ला आहे. गुंजन मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे. या नदीचा उगम वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा या किल्ल्याच्या परिसरात होतो.. भागीनघर या गावाजवळ कानंदी नदी आणि गुंजवणीचा संगम होतो. पुढे भोर तालुक्यात पोहोचल्यावर गुंजवणी नीरा नदीला मिळते. या संगमापूर्वी तिला शिवगंगा नदी मिळते.

गुंजवणी
उगम गुंजवणे
पाणलोट क्षेत्रामधील देश पुणे जिल्हा, महाराष्ट्र
धरणे गुंजवणी (चापेट)
गुंजवणी नदी

पाणलोट क्षेत्रातील गावे

संपादन

गुंजवणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात खालील गावे येतात.

मेट पिलावरे, पाल (बु), पाल (खु), वाजेघर (बु), वाजेघर (खु), लव्ही बुद्रुक, लव्ही खुर्द, फणशी, मेरावणे, गुंजवणे, चऱ्हाटवाडी, घावर, साखर, भागीनघर, मंजाई आसनी, दामगुड आसनी, कोदवडी, वडगाव झांजे, सोंडे कार्ला, सोंडे सरपाले, सोंडे माथना, हिरोजी सोंडे, मार्गासनी, करंजावणे, आंबवणे (वेल्हे)

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन