गीता सेन
गीता सेन या भारतीय स्त्रीवादी अभ्यासक आहेत. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या इक्विटी अँड सोशल डिटरमिनंट्स ऑफ हेल्थ या रामलिंगस्वामी सेंटरमध्ये त्या एक प्रतिष्ठित प्राध्यापिका आणि संचालिका आहेत.[१] त्या हार्वर्ड विद्यापीठात सहायक प्राध्यापक, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरमधील प्रोफेसर एमेरिटस आणि डीएड्ब्ल्युएन (नव्या युगासाठी महिलांसह विकास पर्याय)च्या जनरल कोऑर्डिनेटर देखील आहेत.[१]
शिक्षण
संपादनगीता सेन यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एमए आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. घेतली.[१] त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया, कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट, ओपन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मधून मानद डॉक्टरेट मिळवली आहे .
कारकीर्द
संपादनगीता सेन या जागतिक बँकेच्या एक्सटर्नल जेंडर कन्सल्टेटिव्ह ग्रुपचे पहिल्या अध्यक्षा होत्या. मिलेनियम प्रोजेक्टच्या लिंग समानतेच्या टास्क फोर्सच्या सदस्या होत्या.[१]
गीता सेन यांनी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या २००३-२००७ इंडिया पॉप्युलेशन असेसमेंटसाठी प्रमुख सल्लागार म्हणून अनेक पदांवर संयुक्त राष्ट्रांमध्ये काम केले आहे. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पुनरुत्पादक आरोग्य आणि संशोधन विभागासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक सल्लागार गटावर देखील काम केले.[१]
सध्या, त्या हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे ग्लोबल हेल्थ आणि पॉप्युलेशनचे सहायक प्राध्यापक आहेत.[२] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर येथे प्रोफेसर एमेरिटस आहेत.[३] इ.स. २०२० मध्ये त्यांना डॅन डेव्हिड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४]
निवडलेली ग्रंथसूची
संपादनपुस्तके
संपादन- जेंडर इक्विटी इन हेल्थ: द शिफ्टिंग फ्रंटियर्स ऑफ एव्हिडन्स अँड ॲक्शन (रूटलेज, २०१०).
- महिला सक्षमीकरण आणि लोकसंख्याशास्त्रीय प्रक्रिया - कैरोच्या पलीकडे (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस/IUSSP, २०००).
- लोकसंख्या धोरणांचा पुनर्विचार: आरोग्य, सक्षमीकरण आणि अधिकार (हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९४).
हे सुद्धा पहा
संपादन- लोकसंख्या अभ्यास
- पेगी अँट्रोबस
- लॉर्डेस बेनेरिया
- भारतातील स्त्रीवाद
संदर्भ
संपादन- ^ a b c d e "Gita Sen » High-Level Task Force for the International Conference on Population and Development (Secretariat)". icpdtaskforce.org (इंग्रजी भाषेत). 2018-10-24 रोजी पाहिले.
- ^ "Gita Sen". Gita Sen (इंग्रजी भाषेत). 15 December 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-14 रोजी पाहिले.
- ^ "Gita Sen". Mount Holyoke College (इंग्रजी भाषेत). 2015-08-17. 2018-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-14 रोजी पाहिले.
- ^ Dan David Prize 2020