गीता गोपीनाथ
गीता गोपीनाथ ह्या अर्थशास्त्रज्ञ असून त्या सध्या हॉर्वर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्र ह्या विषयाच्या जॉन झ्वान्स्त्रा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाली आहे.[१] त्या हे पद धारण करणाऱ्या प्रथम महिला व दुसऱ्या भारतीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पूर्वी रघुराम राजन हे ह्या पदावर होते.[१] गीता गोपीनाथ ह्या डिसेंबर २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ हे पद धारण करतील.[२]
गीता गोपीनाथ | |
जन्म | ०८ डिसेंबर १९७१ कोलकाता, भारत |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
गीता गोपीनाथ ह्यांचा जन्म कोलकाता येथे झाला.[३] त्या जन्माने भारतीय आहेत. त्यांचे नंतरचे शिक्षण दिल्ली विद्यापीठात झाले. नंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली.
त्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होती. सूक्ष्म-अर्थशास्त्र(मायक्रोएकॉनॉमिक्स) व व्यापार ह्या विषय़ाच्या त्या तज्ज्ञ आहेत.[३] [४]
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- "10 things to know about Gita Gopinath, IMF's new chief economist" (इंग्लिश भाषेत). १० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- हार्वर्ड विद्यापीठ. "गीता गोपीनाथ ह्यांचे माहितीपान" (इंग्लिश भाषेत). ७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- "इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्त" (इंग्लिश भाषेत). १० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "प्रसिद्धिमजकूर १८/३८६" (इंग्लिश भाषेत). १० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)