गावठी बाभूळ हे बहुधा मोठे झाड असते. त्याला काटे असतात. "सरकारी बाभळीपेक्षा" आपली 'गावठी बाभूळ' जास्त उपयोगी आहे. बाभळीची कडी (?) टणक चिक्कान असते. तुटल्याने तोडल्याने लवकर तुटत नाही.

उपयोग संपादन

मोठे झाड राहिले तर त्याच्या खोडापासून बसायचे पाट, टेबले, खुर्च्या, दरवाजे, खिडक्या तयार करतात. फांद्या सरपण म्हणून वापरतात. बाभळीची काडी छान जळते. फांद्या कुंपण करायला वापरतात. मोठ्या झाडाच्या काडीचे दातण करतात. हे दातण कडू नसते; खूप छान 'तुपट' (तुपासारखे) लागते. दात हलत असले तर बाभळीच्या दातणाने दात आवळून येतात. (दात घट्ट होतात) व दात हलणे बंद होते.बाभळीच्या झाडापासून डिंक निघतो. हा डिंक खातात. कागद, पट्ट्या, चिकटविण्यासाठी हा डिंक वापरतात. शेळ्या व बकऱ्यांना खाण्यासाठी बाभळीचा पाला/शेंगा उपयुक्त आहेत. पाला वाळवून त्याची भुकटी बनवून, पांढरे पाणी जात असल्यास स्त्रीला पाण्यात टाकून देतात. प्रदर किंव्हा पांढर पाणी जात असल्यास काही जण बाभळीचा कच्चा पाला वाटून,त्याच्या रसात खडीसाखर व जिरे टाकून पितात. बी लावल्याने नवीन झाड उगवते. बाभळीच्या बिया बाजारात विकल्या जातात. या बिया वाटून, त्याची भुकटी' (भुरका) बनवून, त्यात हिराकस मिसळून टाकून दात घासतात. या मंजनाला 'मिश्री'म्हणतात. त्यामुळे दात काळे होतात. पण खूपच मजबूत बनतात. कृमी झाल्या' तर तर मुळाचा 'वाक' (दोरी) करून गळ्याला' कंबरेला बांधतात. या वाकामुळे पूर्ण अंगाला वास येतो. व या वासाने 'किरीम' 'भेदरून'(घाबरून) नष्ट होतात.

बाभळीचा चुरा दंतमंजनांमध्ये आणि टूथपेस्टमध्ये वापरतात.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

पुस्तकाचे नाव-गोईण लेखिकेचे नाव-डॉ.राणी बंग