गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरुवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.[]

भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील 22 हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चातील शोध व निदान करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. या तंत्राद्वारे भारतासारख्या विकसनशील देशातील गरीब रुग्णांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यास्वच्तेच्या या कर्करोगाचे निदान आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे.[ संदर्भ हवा ]

महिलांनी आपल्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्व्च्तेच्या सवयींमुळे होते त्यामुळेत्याकडे लक्ष देणेआवश्यक आहे.


संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "गर्भाशयाच्या कॅन्सर रोखण्यासाठी हे माहीत हवंच!". Jalvis Desi (इंग्रजी भाषेत). 2017-02-20. 2018-10-29 रोजी पाहिले.