गरिमा अरोरा (९ नोव्हेंबर, १९८६ - ) ही एक भारतीय आचारी (शेफ) आहे. ती नोव्हेंबर २०१८ मध्ये मिशेलिन स्टार जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. [१][२]

गरिमा अरोरा
जन्म ९ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-09) (वय: ३४)
पाककृती कारकीर्द
पाककला शैली भारतीय पाककृती

सुरुवातीचे जीवन आणि कारकीर्दसंपादन करा

अरोरा मुंबईत मोठी झाली. ती मूळ पंजाबी आहे. शेफ बनण्यापूर्वी तिने सुरुवातीला पत्रकारिता क्षेत्रात काम केले. २००८ मध्ये तिने फ्रांसच्या पॅरिस शहरातील ल कॉर्दां ब्लू येथे आचारीपणाचे शिक्षण घेतले आणि २०१० मध्ये पदवी प्राप्त केली. एप्रिल २०१७ मध्ये बँकॉकमध्ये गाना हे स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी तिने गॉर्डन रॅमसे आणि कोपनहेगनमधील [३] नोमाच्या रेने रेडझेपी यांच्याबरोबर काम केले. गाना हे तीन मजली रेस्टॉरंट असून तेथे पारंपारिक भारतीय तंत्राचा वापर करून आधुनिक चवदार मेनू सादर करतात. [१]

संदर्भसंपादन करा

  1. a b "Chef Arora: India's first woman with a Michelin star". CNN Travel (इंग्रजी भाषेत). 16 नोव्हेंबर 2018. 17 नोव्हेंबर 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "India's first woman to win a Michelin star". BBC News (इंग्रजी भाषेत). 15 नोव्हेंबर 2018. 17 नोव्हेंबर 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Chef Arora: India's first woman with a Michelin star". CNN Travel (इंग्रजी भाषेत). 16 नोव्हेंबर 2018. 18 नोव्हेंबर 2018 रोजी पाहिले.