फल (गणित)

(गणितीय फल या पानावरून पुनर्निर्देशित)

गणितामध्ये फल[][] (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण, ज्यास चल असे म्हणतात, दुसऱ्या परिमाणाचे, ज्यास परचल असे म्हणतात, फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे चल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, चल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो :

कार्टेशी प्रतलावरील आलेखाच्या स्वरूपात दर्शवलेले फलाचे स्वरूप : यात आडव्या अक्षावर x हे निविष्टी असलेले स्वचल परिमाण असून उभ्या अक्षावर त्याची f(x) ही फलनिष्पत्ती दर्शवली आहे. तांबड्या रेघेने दर्शवलेला आलेख f हे फल दर्शवतो.

उदाहरणे

संपादन
 

हे ऋणेतर वास्तव संख्यांवरून त्रिमित अवकाशात, म्हणजेच :  मधे जाणारे फल आहे. लिहताना,   हे फल आहे असे लिहतात. येथे   हे फल आहे,   चल, आणि   हे परचल.  ला  ची  ला असणारी किंमत असेही म्हणतात.

समजा, t या वेळेस या बिंदूचे अवकाशातील स्थान   असल्यास, वरील फलाचे सूत्र

  वा  

असे लिहता येते. फलनाकरिता नेहमीच एखादे सूत्र असेल, असे नाही.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश. p. ११३.
  2. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १२०.