गझनीच्या महमूदची भारतावरील पंधरावी स्वारी
गझनीच्या महमूदची भारतावरील पंधरावी स्वारी ही दक्षिण काठेवाडमधील समुद्रकिनाऱ्यावरील नामांकित सोमनाथ मंदिराच्या विरोधात होती. सोमनाथ मंदिरातील अफाट संपत्ती मिळविणे व मूर्तिभंजक अशी कीर्ती मिळविणे या दुहेरी हेतूने महमूदने सोमनाथवर स्वारी केली. साठ ते ऐंशी हजार पायिक, तीस हजार घोडदळ आणि अनेक सैनिकांसह महमूद गझनीहून भारतावर स्वारी करण्यासाठी आला. मुलतान आणि अजमेरमार्गे तो गुजरातमध्ये पोहोचला.
सोमनाथची लूट
संपादनइ.स. १०२६ च्या मध्याला महमूद सोमनाथ येथे आला होता. त्यावेळी सोमनाथ नगराच्या रक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. सोमनाथची लढाई फक्त तीन दिवस चालली. पहिल्या दोन दिवशी नगराच्या रक्षकांनी निकराचा विरोध केला आणि तिसऱ्या दिवशी हजारो हिंदू लढवय्यांनी महमूदच्या सेनेला घेराव घातला परंतु योग्य संघटनेच्या अभावी लढाईत महमूदचा विजय झाला. सोमनाथनगर आणि मंदिराच्या आसपास सुमारे पन्नास हजार हिंदू कामी आले. विजयानंतर महमूदच्या सैनिकांनी मंदिर आणि नगराची लुटालूट करून तेथील रहिवाशांची हत्या केली.असा हा राजा अतिशय क्रुर व कपटी होता.