गंगातिरी गाय
गंगातिरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून याची उत्पत्ती गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभागातील पट्ट्यातील आहे असे मानल्या जाते.[१]
याला पूर्वी शहाबादी किंवा हरियाना नावाने सुद्धा ओळखल्या जात असे. पांढरा शुभ्र रंग आणि गंगा किनारी याचा आढळ असल्याने याला गंगातिरी असे नाव पडले.
हा गोवंश उत्तरप्रदेशच्या चंदौली, गाझिपूर व बलिया जिल्ह्यात, तसेच वाराणसी, मिर्झापूर, भोजपूर, रोहतास भागात आणि बिहारच्या शहाबाद, भभुआ, बक्सर, अरहा, छपरा भागात मोठ्याप्रमाणात आढळतो.
शारीरिक रचना
संपादनयाचा रंग पांढरा शुभ्र किंवा राखाडी-पांढरा आढळतो. शिंगे मध्यम आकाराचे, पाठीमागे बाहेरून आत वळलेले व टोकाला काळे ठिपके असतात. मध्यम आकाराचे डोके, लहान टोकदार कानं असून मस्तकावर उभार असतो. पापण्या, तोंड आणि खुर काळ्या रंगाचे असतात.
बैलाची सरासरी उंची १४० सें. मी. आणि वजन ३४० किलो असते. तर गाईची सरासरी उंची १२५ सें. मी. आणि वजन २४० किलो असते.
वैशिष्ट्य
संपादनपांढरा रंग, शरीराने मजबूत आणि सुदृढ तसेच दिसण्यास अतिशय आकर्षक असा गोवंश असून, याचा वापर शेतीकामासाठी आणि दूध-दुभते असा दुहेरी हेतूने होतो.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ गौशाला, शांतिधाम (७ जुलै २०१९). "भारतीय नस्ल के 20 सर्वाधिक लोकप्रिय गोवंश है। गंगातिरी नस्ल की गाय के बारे में जानते हैं।" (हिंदी भाषेत). १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Gangatiri Cattle" (इंग्रजी भाषेत). National Bureau of Animal Genetic Resources. 2015-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)