ख्वांग अभयवोंग्शे
मेजर ख्वांग अभयवोंग्शे (देवनागरी लेखनभेद: खुआंग अभयवोंग्शे, ख्वांग अभयवंशे ; थाई: พันตรีควง อภัยวงศ์ ; रोमन लिपी: Khuang Abhaiwongse ;) (मे १७, इ.स. १९०२ - मार्च १५, इ.स. १९६८) हा थायलंडाचा पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता.