ख्रिस्तजन्म तारीख
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाताळ हा ख्रिस्ती धर्मीयांचा महत्त्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या संस्थापनेनंतर बरीच वर्ष हा सण साजरा करण्याची प्रथा पडली नव्हती. मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्त्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता. रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जाई. मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सणसाजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजरा होऊ लागला. आणि इसवी सन ५३४ मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला.
चवथ्या शतकापर्यंत ख्रिस्तजन्मदिन वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असें. काही देशात तर तो नोव्हेंबरमध्ये साजरा केला जात असें. इतर देशात डिसेंबरमध्ये तर अन्यत्र जानेवारीत बहुतेक करून ६ तारखेला, तर कुठे एप्रिलमध्ये हा सण साजरा होई. याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कुणालाच नव्हती. त्याकाळी जन्मतारीख नोंदविण्याची प्रथा नव्हती. यहुदी लोकात तर जन्म दिवसाला अजिबात महत्त्व नव्हते. त्यामुळे जन्मदिवस साजरा करण्याचा प्रश्नच नव्हता.
पहिले पोप लिबेरिअस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मीयांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर ही निश्चित केली. खरे पाहता २५ डिसेंबर या तारखेला पूर्वीचे मूर्तिपूजक लोक (रोमन लोक) सूर्यदेवाचा सण साजरा करीत. दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना थोडा वेळ स्थिर झालेला वाटे तो दिवस हे लोक फारच महत्त्वाचा मानीत (मकर संक्रात). सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परतणार म्हणून सूर्याच्या उत्तरायणाचा (मकरसंक्रात) हा सण या दिवशी साजरा केला जाई. ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता की मी जगाचा प्रकाश आहे म्हणून ख्रिस्ती लोकानी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इग्रजी भाषेत क्रिसमस असेही म्हणतात. क्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असें मानतात. दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा दिवसा अर्पण केला जाई.
मध्यरात्रीचा मिस्सा बेंथलहेम येथे अर्पण केला जाई. हे इस्राएल या देशातील एक छोटेसे गाव आहे. या गावी ख्रिस्ताचा जन्म झाला. या गावातून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरुसलेम येथे पहाटे पोहोचत असे. तेथे दुसरा मिस्सा अर्पण केला जाई. दिवसा याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक एकत्र जमत व तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
६ व्य शतकात डायनासिअस या मठवासी धर्मगुरूने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे. याबाबतचे आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षाना बी. सी. (B.C.) म्हणजे बिफोर ख्राइस्ट (BEFORE CHRIST) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षाना ॲनो डोमिनी (A.D.) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पाडला. यातील एकाची आद्याक्षरे इग्रजी व दुसऱ्याची आद्याक्षरे लॅटिन का याचे कोडे अजून कुणाला उलगडले नाही. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनासिअसचे कॅलेंडर जगभर प्रचारात आले होते. ते बदलता येणे शक्य नव्हते. आजही हेच डायनासिअसचे कॅलेंडर वापरले जात आहे. मात्र इसवी सन पूर्वी ६ ते ७ वर्ष आधी ख्रिस्ताचा जन्म झाला हे अभ्यासकांचे मत निश्चित झाले आहे.
ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ला ख्रिस्ताचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तमस साजरा करतात हे कसे ? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनासिअसचे कॅलेंडर अस्तित्वात नव्हते. ते कसे असेल ? कारण ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षांनी डायनासिअसने आपले कॅलेंडर बनविले. रोमन किवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रुढ होती, त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती. ख्रिस्तजन्म झाला त्या दिवसापासून कुणी तेथूनच १ जानेवारी इसवी सन १ असे मोजायला सुरुवात केली असे नव्हे. तर ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानंतर (इसवी सन ६ व्या शतकात) डायनासिअसने गणिती पद्धतीने ख्रिस्तजन्माचा काळ ठरवला आणि ख्रिस्तजन्मवर्षाला इसवी सन १ असे कल्पून तेथून पुढे ६०० वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) गणिती पद्धतीने त्याने तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणिती पद्धतीने ठरविले पण त्याने तारीख ठरविली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेही गणित ६ ते ७ वर्षांनी कसे चुकले हे आधी आपण पाहिलेच आहे. पहिले पोप लिबेरिअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्तीधर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते कारण तोपर्यंत डायनासिअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबरला, असें जे वर्णन वर आले आहे ते वाचून रोमन लोकांच्या काळात डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर होते काय असा कुणी प्रश्न करील. खरे पाहता डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या. परंतु त्यांत फारच त्रुटी होत्या. डायनासिअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली व त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पहिले पोप लिबेरिअस यांनी ख्रिस्तजन्मोस्तवासाठी निश्चित केलेली तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे निश्चित झाले.[१]
- ^ फादर हिलरी फर्नांडीस. (झेप येशूची २००० वर्षाकडे).