खेमा
बुद्धांची शिष्या, भिक्खुणी, मगधच्या बिंबिसार राजाची पत्नी
खेमा ही बुद्धकालीन बौद्ध भिक्खुणी होती, जी बुद्धांच्या उच्च महिला शिष्यांपैकी एक होती. उप्पलनालनासह बुद्धाच्या दोन मुख्य महिला शिष्यांपैकी ती पहिली मानली जाते. खेमाचा जन्म प्राचीन मद्रा राज्यातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. प्राचीन भारतीय मगध राज्याचा बिंबिसार राजा याची ती पत्नी होती. खेमाची तिचे पती बिंबिसार राजाने बुद्धांनी भेट घडवून आणली होती. बौद्ध ग्रंथांमधील एक दुर्मिळ पराक्रम मानल्या जाणाऱ्या बुद्धांचे एक प्रवचन ऐकत असताना तिला एक सामान्य स्त्री म्हणून ज्ञान (बुद्धत्व) प्राप्त झाले. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर, खेमाने बुद्ध अंतर्गत भिक्षुणी म्हणून मठात प्रवेश केला. बौद्ध परंपरेनुसार बुद्धांनी तिला आपली सर्वात हुशार शिष्या घोषित केले. पुरुषांमध्ये हे स्थान भिक्खू सरिपुत्ताला मिळाले होते.
बाह्य दुवे
संपादन- खेमा सुत्ता - खेमा आणि राजा पसेनादी यांच्यात मृत्यू नंतर बुद्ध अस्तित्त्व या विषयावर देवाणघेवाण.