खेमवती नदी
खेमावती नदी ही महाराष्ट्रातील एक नदी असून ही शहराजवळ बोरी (ता.खंडाळा जि.सातारा) गावाजवळ उगम पावते बोरी गावाजवळ या नदीवर धरण बांधण्यात आले या धरणात या धरणाजवळ पांडवकालीन कुंड आहे याच कुंडाच्या गोमुखातून आणि तसेच शंभू महादेवाच्या डोंगररांगात ही खेमावती नदी उगम पावते, खेमावती नदीवर लोणंद हे मुख्य शहर वसले आहे. लोणंद या गावात खेमावती नदीच्या पश्चिम काठावर श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर आहे.
खेमवती नदी ही निरा- पाडेगाव या गावाजवळ नीरा नदीला मिळते तसेच या नदीची एकही उपनदी नसून बोरी या गावाजवळ या अनेक ओढे नदी नाले एकत्र येऊन ही नदी बनली आहे त्याच पद्धतीने खंडाळा तालुक्यातील एकमेव नदी मानली जाते नीरा नदी खंडाळा तालुक्याच्या उत्तर सीमेवरील मोठी नदी असली तरी या तालुक्यासाठी जीवनदायिनी नदी ही खेमावती नदीच आहे.