खानावळ

खानपानगृह
(खाणावळ या पानावरून पुनर्निर्देशित)

खाणावळ

संपादन

पैसे देऊन जेवण घेण्याचे ठिकाण.

लालबाग-परळ मध्ये गिरणी कामगारांच्या वस्ती होत्या तेव्हा कामगार लोक आपले कुटुंब गावाकडे ठेवून फक्त नोकरी करण्यासाठी चाळीत राहत असत. ह्या कामगारांना जेवण पुरविण्यासाठी कौटुंबिक खाणावळी निर्माण झाल्या.

१९६१ पर्यंत मुंबईत महिना ३५-३६ रुपये घेऊन भरपूर पोटभर अन्न अश्या खाणावळीत मिळत असे. सणासुदीला गोडधोड, अधूनमधून मटण मासे ही दिले जात. खाणावळी चालवण्यासाठी जे कामगार सहकुटुंब आले होते त्यांच्या घरातील स्त्रिया हे काम आपुलकी आणि सामाजिक जाणिवेतून करीत. खाणावळी चालवणारी आणि खाणावळीचा लाभ घेणारी माणसे एकमेकांच्या परिचयाची असत. प्रत्येक जण आपल्या भुकेप्रमाणे जेवून तृप्त होत असे आणि कामगार आजारी पडला तरी त्याला तांदळाची पेज अथवा अन्य पथ्यपाणी सुद्धा पुरविले जाई.

खाणावळ चालवणारे सकाळी चार वाजता उठून आपला दिनक्रम चालू करीत असत. खाणावळीत शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण उपलबद्ध असते.

कालांतराने जेव्हा कापड गिरण्या बंद झाल्या तेव्हा अश्या खाणावळी बंद झाल्या. तरीसुद्धा वडाळा, काळाचौकी, अभ्युदय नगर, विक्रोळी, कांजुरमार्ग येथे नवीन खाणावळी चालू झालेल्या आहेत.

संदर्भ

संपादन

महाराष्ट्र टाईम्स ११/०२/२०२०.