क्रुझर

मोठ्या युद्धनौकांचे प्रकार

क्रुझर हा लढाऊ नौकांचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या लढाऊ नौका अनेक शतके वापरात आहेत पण या दरम्यान क्रुझर शब्दाचा अर्थ वेगवेगळा होता. शिडाच्या नौकांतील क्रुझर ही एकांड्या मोहीमांवर जात असे व त्यात टेहळणी, लुटालूट तसेच इतर नौकांचे रक्षण यांचा समावेश होत असे. आधुनिक काळातील क्रुझराही याच प्रकारे वापरल्या जातात. क्रुझरांचा आकार अगदी छोट्या पासून प्रचंड असू शकतो.