ख्रिश्चन बर्नार्ड ( ८ नोव्हेंबर १९२२ - २ सप्टेंबर २००१) हे दक्षिण आफ्रिकेचे ह्रदयाचे सर्जन होते. त्यांनी जगातील पहिली मानव-ते-मानव हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ३ डिसेंबर १९६७ रोजी बर्नार्ड यांनी अपघातग्रस्त डेनिस दारव्हाल यांचे हृदय ५४ वर्षांच्या लुई वॉशकंस्कीच्या छातीत प्रत्यारोपण केले. या प्रत्यारोपणानंतर लुई वॉशकंस्की १८ दिवस जीवंत होते व न्यूमोनियाने मृत्यु पुर्व पत्नीशी सहज बोलू शकले. बर्नार्ड यांनी श्री. आणि श्रीमती वॉशकांस्की यांना सांगितले होते की ऑपरेशनमध्ये यशस्वी होण्याची शक्यता ८०% आहे. बर्नार्ड यांनी दुसरी हृदयारोपणाची शस्त्रक्रिया केलेले रूग्ण फिलिप ब्लेबर्ग दीड वर्ष जगले.
दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतातील बफोर्ट वेस्ट या गावी त्यांचा जन्म झाला. वैद्यक शास्त्राचा शिक्षण नंतर बर्नार्ड यांना कुत्र्यांवर प्रयोग करीत असताना अर्भकांचा आतड्यांसंबंधी अट्रेसिया हा दोष शस्त्रक्रिया करून बरा करण्याचे तंत्र विकसित केले. त्याच्या या तंत्रामुळे केपटाऊनमधील दहा मुलांचे प्राण वाचले आणि नंतर ब्रिटन आणि अमेरिकेतील शल्यचिकित्सकांनी त्यांच्या तंत्राचा अवलंब सुरू केला. १९५५ साली ते अमेरिकेत गेले आणि सुरुवातीला मिनेसोटा विद्यापीठात ओवेन हार्डिंग वॅन्जेन्स्टिन यांनी त्यांच्यावर जठरोगविषयक संशोधनाचे काम सोपवले. नंतर बार्नार्ड यांना ओपन हार्ट सर्जरीचे जनक डॉ. वॉल्ट लिलीही यांच्या समावेत काम करण्याचा योग आला. १९५८ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेला परतले. तेथे बर्नार्ड यांना केप टाउनच्या ग्रूट श्यूर हॉस्पिटलमध्ये प्रायोगिक शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.
१९८३ मध्ये केप टाउनमधील कार्डियोथोरॅसिक सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर जगभरातील वंचितांच्या मुलांना मदत करण्यासाठी समर्पित अशा ख्रिश्चन बार्नार्ड फाउंडेशनची स्थापना केली. २००१ मध्ये दम्याच्या विकार झाल्यानंतर वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.