कोर्टेझ (कॉलोराडो)
कोर्टेझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. माँटेझुमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या कोर्टेझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ८,७६६ होती.[२]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कोर्टेझ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोर्टेझ (निःसंदिग्धीकरण).
या शहराला स्पॅनिश काँकिस्तादोर एर्नान कोर्तेसचे नाव देण्यात आले आहे.[३] मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान, फोर कॉर्नर्स आणि मॉन्युमेंट व्हॅली येथून जवळ आहेत. याशिवाय क्रो कॅन्यन पुरातत्त्वीय केन्द्र, कॅन्यन ऑफ द एन्शंट्स राष्ट्रीय स्मारक आणि होवेनवीप राष्ट्रीय स्मारक ही प्राचीन स्थळे या प्रदेशात आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 4, 2021 रोजी पाहिले.
- ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 15.