कोरियन कले मध्ये सुलेखन, संगीत, चित्रकला आणि कुंभारकामातील परंपरेचा समावेश आहे, बहुतेकदा नैसर्गिक प्रकार, पृष्ठभाग सजावट आणि ठळक रंग किंवा आवाज यांचा वापर करून गोष्टी चिन्हांकित केल्या जातात.

ध्यान मध्ये बसलेले गिल्ट-ब्राँझ मैत्रेय .

कोरियन कलेची सर्वात प्राचीन उदाहरणे ३००० ईसापूर्व काळातील पाषाणयुगाची आहेत .[] यामध्ये प्रामुख्याने मातीयुक्त शिल्प आणि पेट्रोग्लिफचा समावेश आहे.

या सुरुवातीच्या काळात विविध कोरियन राज्ये आणि राजवंशांच्या कला शैली उदयास आल्या. कोरियन कलाकारांनी कधीकधी साध्या अभिजातपणा, उत्स्फूर्तपणा आणि निसर्गाच्या शुद्धतेबद्दल कौतुक असलेल्या मूळ परंपरासह चीनी परंपरा सुधारल्या.

गोरीयो राजवंश (९१८ ते १३९२) या काळात कोरियन कला मोठ्या प्रमाणात वृधिंगत झाली, विशेषतः कुंभारकामाची कलेसाठी हा कालावधी सहाय्यक ठरला.

कोरियन आर्ट मार्केट हे सोलच्या इंसाडॉंग जिल्ह्यात स्थित आहे. येथे ५०हून अधिक छोट्या छोट्या गॅलरींमधून कलेचे प्रदर्शन होत असतात. अधूनमधून अशा कलाकृतींचे लिलाव होत असतात. गॅलरी सहकार्याने चालवल्या जातात. लहान आणि बऱ्याचदा छान सजवलेले आणि बारीक डिझाइन असलेल्या गोष्टींचे प्रदर्शन भरवत असतात. प्रत्येक गावात त्यांच्या स्वतःच्या छोट्या प्रादेशिक गॅलरी असतात. यामध्ये स्थानिक कलाकार पारंपारिक आणि समकालीन माध्यमांमध्ये कलेचे प्रदर्शन करत असतात. आर्ट गॅलरीमध्ये सहसा माध्यमांचे मिश्रण असते. पश्चिमेकडील कला अधिक ठळकपणे आणण्याच्या प्रयत्नांना सहसा कोरियाबाहेर म्हणजे न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लंडन आणि पॅरिस येथे यश मिळते.

इतिहास

संपादन

कलेच्या व्यावसायिकांनी कोरियाची स्वतःची अनोखी कला संस्कृती आत्मसात आणि तयार करण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वी केवळ चीनी संस्कृती प्रसारित होत होती. या व्यावसायिकांनी स्वतःची एक वेगळी संस्कृती आणि कोरियाची कलेच्या भूमिकेची ओळख पटविणे आणि त्यांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या राष्ट्रात जन्मलेली आणि विकसित झालेली कला ही त्या राष्ट्राची कला असते.[]

नवपाषाण युग

संपादन
 
कंघी-पॅटर्नची भांडी .

मानवाने किमान ५०,००० बीसी पासून कोरियन द्वीपकल्प व्यापला आहे.[][] अंदाजे ७,००० बीसी मध्ये बनवेलेली मातीची भांडी सापडली आहेत. ही मातीची भांडी चिकणमातीपासून बनविली गेली होती आणि सुमारे ७०० अंश सेल्सियस तापमानात मोकळ्या किंवा अर्ध-खुल्या खड्ड्यांमधून बनवली असावित.[]

७,००० इ.स.पू.च्या मातीच्या भांड्यांचे बुड सपाट होते. त्या यंगगी-मून शैलीचे आहेत. ही भांडी आडव्या रेषांनी सुशोभित केलेल्या होत्या तसेच इतर विविध प्रकारचे ठसे वापरले होते.

ज्युलमॉन- प्रकार मातीची भांडी, सामान्यत: शंकूच्या आकाराचे असते आणि कंगवाच्या पॅटर्नसहित तयार केलेली होती. पुरातत्त्व अभिलेखानुसार साधारणत: ६००० बीसी मध्ये बनवलेल्याचे आढळून आले. या भांड्यांचा प्रकार सायबेरियन शैलीसारखा आहे.

मुमुन- प्रकार मातीची भांडी अंदाजे २००० बीसी मध्ये उदयास आली. ही भांडी आकाराने मोठी आणि न-सजवलेली भांडी होते. ही मुख्यतः स्वयंपाक आणि सामान साठवण्यासाठी वापरली जात असत.

कांस्य युग

संपादन

साधारण २००० ईसापूर्व आणि ३०० ईसापूर्व दरम्यान कोरियामध्ये कांस्य वस्तू आयात होण्यास आणि बनविण्यास सुरुवात झाली. इ.स.पू. सातव्या शतकापर्यंत कोरियामध्ये एक देशी कांस्य संस्कृतीची स्थापना झाली होती. कोरियन ब्राँझमध्ये जस्ताची ठराविक टक्केवारी होती.[] यावेळी तयार केलेल्या वस्तूंमध्ये तलवारी, खंजीर आणि भाला अशी शस्त्रे होती. तसेच, आरसे, घंटा आणि रॅटल सारख्या विधीच्या वस्तू बनविल्या गेल्या. या वस्तू सांस्कृतिक मानल्या जाणाऱ्या डोल्मेन्समध्ये पुरल्या गेल्या होत्या. याव्यतिरिक्त, ६ व्या शतकाच्या आसपास लोह-युक्त लाल भांडी तयार होऊ लागली. स्वल्पविरामाच्या आकाराचे मणी, सहसा नेफ्राईटपासून बनविलेले, कोककोक म्हणून ओळखले जातात, हे देखील डॉल्मेन बुरियल्समध्ये आढळून आले आहेत. कोककोक बहुतेकदा अस्वलाच्या पंजाच्या डिझाईनने स्फुर्ती घेऊन बनवले असावेत. सायबेरियन कलेच्या एक्स-रे शैलीमध्ये "लाइफ लाइन" दर्शविणाऱ्या प्राण्यांच्या दगडातील रेखांकनांमध्ये देखील सायबेरियन प्रभाव दिसून येतो.[]

लोह युग्

संपादन

कोरिया मध्ये इ.स.पू. ३०० च्या सुमारास लोह युग सुरू झाले. चीनी सैन्यदलांमध्ये आणि जपानमध्ये कोरियन लोखंडाला खूप महत्त्व प्राप्त झाले होते. कोरियन कुंभारकाम कुंभाराच्या चाकामुळी आणि चढत्या भट्टीच्या वापरामुळे फार प्रगत झाले होते.

तीन राज्ये

संपादन

या काळाचा कालावधी इ.स.पू. ५७ ते ६६८ इ.स. पर्यंत आहे. या काळात ३ राज्यकर्ते म्हणजे गोगुरिएओ, बाएकजे आणि सिल्ला यांनी या द्वीपकल्पात नियंत्रण मिळविले होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Lin, Nancy (2016). "5,000 Years of Korean Art". History of Collections. 28 (3): 383–400. doi:10.1093/jhc/fhv047.
  2. ^ Basukala, Saloni, and Supriya. "LASANAA Art Talk: 28 August." LASANAA. WordPress, 04 Sept. 2012. Web. 16 Sept. 2015.
  3. ^ Ki-baek Yi (1984). New History of Korea. Harvard University Press. p. 1. ISBN 978-0-674-61576-2. 4 January 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Bae, Christopher J.; Bae, Kidong (1 December 2012). "The nature of the Early to Late Paleolithic transition in Korea: Current perspectives" (PDF). Quaternary International. 281: 26–35. Bibcode:2012QuInt.281...26B. doi:10.1016/j.quaint.2011.08.044. 22 October 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 January 2013 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Heilbrunn Timeline of Art History: Korea, 1–500 A.D." Metropolitan Museum of Art. 4 January 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "Korean art". Encyclopædia Britannica.

पुढील वाचन

संपादन

बाह्य दुवे

संपादन