कोयना जलविद्युत प्रकल्प
कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळून या टप्प्यातून 2958 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो.
कोयना धरण
कोयना नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते,कोयना नदीवर कोयना धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची १०३.२ मीटर(३३९ फूट) व लांबी ८०७.२ मीटर (२,६४८ फूट) आहे.
चौथा टप्पा
संपादनसह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टेपिंग पद्ध्तीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.
हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे.