कोन्हेरी
कोन्हेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
?कोन्हेरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मोहोळ |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | गणेश पांढरे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनकोन्हेरी गाव सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात आहे. मोहोळ पासून 20km अंतरावर पश्चिम दिशेस आहे. येथील भूभाग सपाट आहे. तसेच या ठिकाणी आष्टी उपसा सिंचन योजना अंतर्गत कॅनॉल गावच्या चारही बाजूने आहे. या ठिकाणी ज्वारी मका हरभरा तूर उडीद मूग गहू यासारखी पिके घेतली जातात तसेच द्राक्षे डाळिंब केळी ऊस अशी नगदी पिके घेतली जातात. येथील ग्रामपंचायत 1956 ला स्थापन झाली आहे.
हवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनयेथील लोकजीवन साधारण स्वरूपाचे आहे. सर्वजण एकमेकांना मदत करतात. या ठिकाणी बागायत क्षेत्र वाढत आहे. या गावाचे 1 ले सरपंच श्रीमंत शेळके.2 रे सरपंच दत्तात्रय आप्पा शेळके ते जिल्हा local board चे सदस्य होते आणि z p member होते. पंचायत समिती सदस्य भीमा शुगर चे संचालक होते.3 रे सरपंच जनार्दन माळी ते z p member होते.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनयेथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले सात सय्यद पिरसाहेब बाबा चे दर्गा आहे, तसेच श्री हनुमान मंदिर आहे, श्री शंभुमहादेवाचे अतिप्राचीन मंदिर आहे, तुळजाभवानी मंदिर आहे.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनकोन्हेरी गावच्या पूर्वेस 5 km अंतरावर सारोले , पश्चिम दिशेस पाप री दक्षिणेस पेनुर,उत्तरेस 5 km वडाचीवडी, हिवरे,चिखली, गाव आहे.