कोथळा हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव आहे. हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे. गडावर जाणाऱ्या मार्गापैकी तोलार खिंड मार्गावर अकोलेहून जाण्याकरिता कोथळा गावात जावे लागते. गावाला हे नाव येथील 'कोथळा' नावाच्या टेकडीवरून पडले आहे.
गावाजवळील देवराईमध्ये शेकरू नावाची नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी खार सापडते.

कोथळा नावाची टेकडी