कोतोकू सातो
लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो (जपानी:佐藤 幸徳; ५ मार्च, इ.स. १८९३:यामागाता प्रभाग, जपान - २६ फेब्रुवारी, इ.स. १९५९) हा जपानी सैन्याधिकारी होता.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान सातो म्यानमारमधून भारतावर आक्रमण करणाऱ्या जपानी सैन्याचा सेनापती होता. कोहिमाच्या लढाईनंतर माघार घेतल्यावर हा बेत फसला. ही माघार त्याने सर्वोच्च सेनापतीकडून आदेश न येताच घेतली होती. जपानच्या या नामुष्कीला सातो स्वतः जबाबदार असल्याचा आरोप करून इतर जपानी सेनापतींनी त्याला सेप्पुकु (आत्महत्या) करण्यास सांगितले परंतु सातोने ते फेटाळून लावत स्वतःवर लश्करी खटला चालविण्याचे आवाहन केले. त्याद्वारे त्याने आपली वैयक्तिक जबाबदारी नसल्याचे दाखविले.
युद्ध संपल्यावर सातोने आपल्या जु्न्या सहकाऱ्यांना मदत करण्यात आपले लक्ष गुंतविले. आपल्या अधिकाराखाली धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी त्याने मात्सुयामा, एहिमे आणि शोनाइ, यामागाता येथे स्मारके उभारली.