कॉम्‍प्‍युटर नेटवर्क

(कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

संगणक नेटवर्क (कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क बेसिक)

संपादन

नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सामान्य नेटवर्किंग टर्म

1) नोड - Node:

संपादन
 
नोड - Node

नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात. हे नोड एखादा कॉप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते.


2) होस्ट -Host:

संपादन
  • नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कॉम्प्युटर किंवा इतर उपकरण असते.
  • नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोडसना रिसोर्सेस, सर्विसेस आणि ॲप्लीकेशन पुरवितात.

3) नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC):

संपादन
 
नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC)

नेटवर्क इंटरफेस कार्ड कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते.


4) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम Network operating system (NOS):

संपादन
  • ही ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्क मधील सर्व कॉम्प्युटर्सचे कार्य सांभाळते.
  • याची रचना सर्व्हरवर चालविण्यासाठी बनवली गेली आहे आणि सर्व्हरला डेटा मॅनेज करणे, युझर, ग्रुप, सेक्युरिटी, ॲप्लीकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.

5) लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):

संपादन
 
LANtopo

लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे कॉम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा, किंवा एक इमारतीतील कार्यालय अश्या मर्यादित परिसरातील कॉम्प्युटरला इंटरकनेक्ट करते.


6) वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network):

संपादन
 
WAN1

वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत केलेले असते जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात.


7) प्रोटोकॉल -Protocol:

संपादन

प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे.


8) इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):

संपादन

इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सुट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो. याचे राऊटींग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते.


9) ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):

संपादन
  • ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो.
  • टिसीपी हा ओएसआय (OSI) लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे.

10) फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल - FTP (File Transfer Protocol):

संपादन

| फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टॅंडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे जो कॉम्प्युटरमधील फाइल टिसीपी बेस्ड नेटवर्क जसे इंटरनेटमध्ये एका होस्ट कडून दुस-या होस्ट कडे पाठवतो.


11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System):

संपादन
 
डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System)

]]

  • डोमेन नेम सिस्टीम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या कॉम्प्युटर, सर्विस किंवा इतर संसाधनासाठी वापरली जाणारी वितरीत नामांकन सिस्टीम आहे.
  • डीएनएस (DNS) ही इंटरनेट डोमेन आणि (Host) होस्टनेमला त्यांच्या आयपी (IP) मध्ये अनुवादित करते.
  • डीएनएस (DNS) आपोआप वेब ब्राउझर मध्ये टाइप केलेल्या नावाला या साइट होस्ट करत असलेला वेब सर्व्हरच्या आयपी (IP) ॲड्रेस मध्ये रूपांतरीत करतात.

कॉम्यूटर नेटवर्क

संपादन

]] कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरसंबंधीत उपकरणे यांचा संच.कॉम्पुयटर नेटवर्क मधील मिडिया हे वायर किंवा वायरलेस असु शकते.


नेटवर्किंग फायदे

संपादन
  • वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यांसह संप्रेषण (ईमेल, गप्पा, संदेश) करु शकतात.
  • विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात.
  • नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकटे यंत्रापेक्षा सोपे होऊ शकते. नवीन वापरकर्त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रवेश अधिकारांसह सर्व्हरवर खाते तयार केले जाऊ शकते.
  • नवीन उपकरणे नेटवर्कशी कनेक्ट केली जाऊ शकतात आणि आधीपासून तयार केलेल्या सर्व योग्य सेटिंग्ज असलेल्या नेटवर्कवरून डिस्क प्रतिमा कॉपी केली जाऊ शकते.
  • डेटा सामायिक केला जाऊ शकतो म्हणून, हे डुप्लिकेशन टाळू शकते.
  • वापरकर्त्यांना नेटवर्कवरील हार्ड ड्राइववरील प्रवेश किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
  • संसाधने (प्रिंटर, स्कॅनर) नेटवर्कवर शेअर केले जाऊ शकतात.
  • यामुळे मशीनमध्ये आवश्यक असलेल्या साधनांची संख्या कमी होते.
  • बॅक-अप आणि व्हायरस-चेकिंगसारख्या नियमित देखरेख कार्यांना वापरकर्त्यांच्या हातून बाहेर काढता येते.
  • संपूर्ण सर्व्हरवरील सर्व्हरवरून हे कार्यप्रदर्शन करून, प्रशासक असे कार्य पूर्ण केल्याचे सुनिश्चित करू शकतात.
  • एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ॲप्लिकेशन्स सर्व्हरवर साठवून ठेवता येऊ शकतात.

नेटवर्कचे वर्गीकरण: Types of Networks:

संपादन

साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक आकारावरून होते -

1) लोकल एरिया नेटवर्क - LAN (Local Area Network):

संपादन
 
LANtopo

लोकल एरिया नेटवर्क (लॅन) नेटवर्कमधील संगणक मर्यादित क्षेत्रात विखुरलेले असतात. जसे एकाच बिल्डींगमध्ये, एकाच ऑफीसमध्ये किंवा अगदी जवळजवळ असणाच्या काही इमारतीत. मात्र, लॅनमधील प्रत्येक संगणकात सीपीयु असतो. हा सीपीयु संगणकाला प्रोग्राम्स् सुरू करायला मदत करतो, त्याचप्रमाणे लॅनमधील इतर कोणत्याही संगणकातील डेटा किंवा इतर साधनांचा वापर करून घेण्यात मदत करतो. त्यामुळे अनेक लोक एकच डेटा किंवा उपकरण वापरू शकतात. युजर्स एकमेकांशी ईमेल किंवा चॅटद्वारे संवादही साधू शकतात. लॅनमध्ये डेटाची ने-आण वेगाने होते. पण लॅनमधील संगणक जवळजवळ असल्याने दूरवर असणा-या संगणकांपर्यंत डेटा पाठवता येत नाही. लॅन दोन प्रकारचे असते. Client/Server LAN मध्ये Server वर सर्व डेटा व प्रोग्राम्स् ठेवलेले असतात। व प्रत्येक क्लाएंटच्या आवश्यकतेनुसार डेटा किंवा प्रोग्राम्स पुरवले जातात.

  • लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे घर, शाळा, प्रयोगशाळा, किंवा एकाच इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील कॉम्प्युटर नेटवर्क आहे.
  • लॅन अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग उपलब्ध आहे.
  • प्रिंटर, फाइल सर्व्हर, स्कॅनर आणि इंटरनेट सारखी संसाधने कॉम्प्युटरवर शेअर करणे अधिक सोपे आहे.
  • लॅन हे वायर किंवा वायरलेस किंवा एकाच वेळी दोन्ही फॉर्म मध्ये असु शकते.
  • सर्वात लोकप्रिय लोकल एरिया नेटवर्किंग प्रोटोकॉल आज इथरनेट आहे.

2) मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क - MAN (Metropolitan Area Network):

संपादन
 
Manetworkfinal

मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन) मध्ये दोन शहरे किंवा गावे नेटवर्कने एकमेकांना जोडलेली असतात, मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन)चे अगदी रोजच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे सेल्युलर फोन

  • मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन)चे क्षेत्र लॅन पेक्षा जास्त असते, हे एखादे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असु शकते.
  • मोठया संस्थेंकडून एकाच शहरातील अनेक ऑफिसेस कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क हे अनेक लॅनला फायबर-ऑप्टिकल केबलने एकत्र जोडते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) प्रमाणे सेवा पुरविते.

3) वाइड एरिया नेटवर्क- WAN (Wide Area Network):

संपादन
 
WAN1

वाइड एरिया नेटवर्क दोन किंवा दोनपेक्षा अधिक लॅन चाही समावेश होऊ शकतो. वाइड एरिया नेटवर्क मधील संगणक बहुतेक वेग परस्परांना टेलिफोन केजलने जोडलेले असतात. त्याशिवाय सॅटेलाईट किंवा Leased line ने सुद्धा ते जोडलेले असू शकतात. इंटरनेट हा वाइड एरिया नेटवर्कचा सगळ्यात मोठा प्रकार होय. भारतातील वाइड एरिया नेटवर्कचे उदाहरण आहे ERNET (Education Research Network) खूप दूरदरचे संगणक एकमेकांना जोडलेले असल्याने वाइड एरिया नेटवर्क मध्ये डेटा वाहन नेण्याची गती कमी असते. तसेच अंतरामुळे त्यात ब-याच त्रुटी असतात.

  • वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत असते.
  • म्हणजे यात महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे टेलिफोन प्रणाली, फायबर-ऑप्टिक केबल्स, उपग्रह किंवा लिज लाईन वापरून कनेक्टीव्हिटी देतात. इंटरनेट हे जगात सर्वात मोठी वॅन आहे.

संगणक नेटवर्क टोपोलॉजी (कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी)

संपादन
  • नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
  • नेटवर्क टोपॉलॉजी ही एक कॉम्प्युटर नेटवर्कमधील विविध घटकांची (लिंक, नोड, इत्यादी) रचना आहे.

संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:

संपादन
 
कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी

1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):

  • पॉइंट-टू-पॉईंट (PTP) टोपॉलॉजी एकच केबलचा वापर करून थेट दोन नोड्ज कनेक्ट करते.
  • मोडेमद्वारा दोन कॉम्प्युटरमधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपॉलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.

2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):

संपादन
 
Bus Topology

बस टोपॉलॉजी हे लहान ऑर्गनायझेशनद्वारा वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने जोडलेला असतो.

फायदे (Advantages)-

  • बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
  • याचा वापर आणि ही समजून घेणे सोपे आहे.
  • यात एक कॉम्प्युटर किंवा तत्सम डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे असते.
  • या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.

तोटे (Disadvantages)-

  • खूप जास्त मोठे नेटवर्क असेल तर बस टोपॉलॉजी खूप स्लो होते.
  • मुख्य केबल ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क बंद होते.

3) स्टार नेटवर्क (Star Topology):

संपादन
 
Star Topology
  • स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात आणि हे उपकरण एखादा होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असू शकते.
  • हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
  • यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.
  • स्टार नेटवर्कमध्ये उपकरणे बहुधा अनशील्ड ट्विस्टेड पेअर्ड (UTP) केबलने जोडलेली असतात.

फायदे (Advantages)-

  • बस नेटवर्कच्या विपरीत, स्टार नेटवर्कमध्ये एखादा नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही.
  • नेटवर्कमध्ये दुसरे वर्क स्टेशन जोडणे सोपे आहे.
  • केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

तोटे (Disadvantages)-

  • केंद्रीय उपकरण अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर त्याचा परिणाम होतो.

4) रिंग बस टोपॉलॉजी (Ring Topology):

संपादन
 
Ring Topology
  • रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
  • यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने पाठवितो.

फायदे (Advantages)- सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.

तोटे (Disadvantages)-

  • यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
  • एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.

5) मॅश पॅकेट (Mesh Topology):

संपादन
 
Mesh Tolology
  • मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
  • या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्टना जोडलेला असू शकतो.
  • या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.

फायदे (Advantages)- मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो.. तोटे (Disadvantages)-

  • यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
  • हा मॅनेज करणे फार कठीण आहे.

6) ट्री पॅकेट (Tree Topology):

संपादन

यालाच हायरार्किकल असे म्हणतात.


  • ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी यांचे संयोजन आहे.
  • ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
  • यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
  • ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमीजीएट नोडला कितीही नोड्ज कनेक्ट असू शकतात.
  • या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
  • इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..

फायदे (Advantages)-

  • यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी देतो.
  • उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
  • नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.

तोटे (Disadvantages)-

  • जेव्हा नेटवर्क खूप मोठे असते, तेव्हा नेटवर्कचा मेंटेनन्स एक समस्या होऊ शकते.
  • ट्री टोपॉलॉजी ही अनेक बस टोपॉलॉजी मिळून बनते, त्यामुळे जेव्हा याचा आधारस्तंभ बाधित होतो, तेव्हा पूर्ण नेटवर्क बाधित होते.

7) हायब्रिड टोपॉलॉजी (Hybrid Topology):

संपादन
  • हायब्रिड टोपॉलॉजी हे दोन किंवा अधिक बेसिक टोपॉलॉजीचे इंटरकनेक्शन आहे, ज्यातील प्रत्येकजण नेटवर्कमध्ये भाग घेतो, परिणामी ही कोणतीही मानक टोपॉलॉजी प्रदर्शित करीत नाही.
  • इंटरनेट हे हायब्रिड टोपॉलॉजीचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.

फायदे (Advantages)-

  • शोधताना चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे सोपे आहे.
  • प्रभावी आहे.
  • आकार म्हणून स्केलेबल सहज वाढवता येऊ शकते.
  • लवचिकता आहे.

तोटे (Disadvantages)-

  • मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचा होतो.
  • हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.