केशवपन
केशवपन ही भारतातील, विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात विधवा स्त्रीयांच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्याची पद्धत होती. आधुनिक काळात यावर कायद्याने बंदी घातली आहे. पां.वा. काणे यांनी या प्रथेला विरोध केला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ सिद्धनाथ गानू. पां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का?. BBC News मराठी. 08-05-2018 रोजी पाहिले.
केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचं वकीलपत्र घेतलं होतं.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
केशवपन या दुष्ट प्रथेने महाराष्ट्र्रातील पुरुषप्रधान ब्राम्हण समाजातील लोक, समाजातील "विधवे"ला केशवपन करून व उर्वरित आयुष्य लाल साडी हा "ड्रेस कोड" देऊन तिचा पाय वाकडा पडू नये याची त्यांना सोयीची "समाज व्यवस्था" अमलात आणे. ही प्रथा ब्राह्मण समाजात(एकूण मराठी समाजातील ४ % भाग) कधी सुरुवात झाली याबद्दल इतिहासात जास्त उल्लेख सापडत नाहीत.
केशवपन ही केवळ ब्राह्मण समाजातच प्रचलित असलेली दुष्ट, माणुसकीशून्य आणि लाजिरवाणी रूढी होती. त्या काळी सातव्या/आठव्या वर्षी मुलींची लग्ने होत. अशा कित्येक मुलींवर तर त्या वयात येण्यापूर्वीच वैधव्य कोसळे. पण पत्नी वारली तर पुनर्विवाह करण्याचा पुरूषाला अधिकार असे. पण स्त्रीला मात्र तो अधिकार नव्हता. दुसरीकडे नवरा गेल्यानंतर अशा मुलीने पुनर्विवाह करू नये ,पवित्र राहावे, व्यभिचार करू नये म्हणून तिच्यावर जाचक बंधने असत. एक माणूस म्हणून जगण्याचा तिला अधिकार नसे.
हे शक्य करण्यास केशवपन (स्त्रीच्या सौन्दर्याचे वैशिष्टय असलेली डोक्यावरील सुरेख व लांब केस पूर्णपणे काढून ) हा प्रकार तिला अतिशय कुरूप करून टाकण्यासाठीच असे. याउप्पर तसे केले नाही तर तिला देवधर्म, सोवळ्यातला स्वयंपाक वगैरेला परवानगी नसे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नात्यातले, संबंधात येणारे काही पुरूष तिचा गैरफायदा घेत. त्यातून तिला दिवस गेले तर अंधाऱ्या खोलीत तिला डांबून गावठी पद्धतीने गर्भपात केला जाई. त्यात तिचा जीव जाण्याचेही प्रकार घडत.
नंतर ब्राह्मण समाजसुधारकांनीच या सर्व दुष्ट रुढींविरुद्ध बंड केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. निराधार विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रिया यांच्यासाठी हिंगणे येथे आश्रम स्थापन करून त्यांच्या शिक्षणाची व साहजिकच स्वावलंबी होण्याची सोय केली.