केदुर्ली
केदुर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
?केदुर्ली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुरबाड |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनकेदुर्ली हे गाव समुद्रसपाटीपासून 18 मीटर उंचीवर आहे.
हवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
संपादनकेदुर्ली येथील लोक हे पारंपरिक वेशभूषा करतात. वृद्ध स्रिया नऊवारी व पुरुष धोतर परिधान करतात. तरुण लोक आधुनिक पोशाख परिधान करतात.रोजच्या जेवणात तांदूळ भाकरी व भात , स्थानिक भाज्या यांचा समावेश असतो. बहुतेक लोक माळकरी आहेत.प्रामुख्याने मराठी भाषा लोक बोलतात. सर्व सण आनंदाने साजरे होतात
केदुर्ली या गावाच्या पूर्वेस 7किमी अंतरावर सह्याद्री डोंगराच्या माथ्यावर थंड हवेचे ठिकाण गोरखगड आहे. मुंबईहुन अनेक गिर्यारोहक तिथे भेट देतात. केदुर्ली पासून 4किमी अंतरावर म्हसोबा हे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी म्हसोबाची जत्रा दरवर्षी तिथे भरते. केदुर्ली गावात ग्रामसभा कार्यालय आहे. त्याच उपयोग मासिक ग्रामसभा व इतर तात्कालिक सभासाठी केला जातो.सासणे या शेजारच्या गावात डाक कार्यालय आहे.राज्य परिवहनच्या बस मुरबाड ते केदुर्ली दरम्यान ये- जा करतात.गावात एक खाजगी दवाखाना आहे.गावात अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. केदुर्लीच्या पूर्वेस म्हाड्स गाव आहे.दक्षिणेकडे आंबेगाव तर पश्चिमेस सासणे गाव आहे .उत्तरेकडे शेलारी गाव आहे.