कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक

कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक हा एक अल्पजीवी आणि मान्यता नसलेला देश होता. इ.स. १८४६मध्ये मेक्सिकोच्या आधिपत्यात असलेल्या अल्ता कॅलिफोर्नियामधील लोकांनी उठाव करून १४ जून ते ९ जुलै दरम्यान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. यांतील बहुसंख्य लोक अमेरिकेमधून बेकायदेशीर मेक्सिकोमध्ये घुसलेले होते. त्यांच्यावरील जमीन विकत किंवा भाड्याने घेण्यास बंदी तसेच इतर जाचक कायद्यांविरुद्ध हा उठाव होता. मेक्सिकोले लवकरच अमेरिकेशी युद्ध होणे अपेक्षित होते व असे झाल्यास हे अमेरिकन लोक मेक्सिकोविरुद्ध कारस्थाने करतील अशी काळजी होत. त्यामुळे या लोकांना कॅलिफोर्नियातून परत घालवून देण्याचा बेत आखला गेला होता. याचा सुगावा लागून या लोकांनी आधीच उठाव केला. यानंतर लगेच सुरू झालेल्या मेक्सिको-अमेरिकन युद्ध येथपर्यंत पोचले व त्याची परिणती अल्ता कॅलिफोर्निया अमेरिकेत शामील होण्यात झाली.