कॅलाव्हेरास काउंटी (कॅलिफोर्निया)

कॅलाव्हेरास काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सान अँड्रियास येथे आहे.[]

कॅलाव्हेरास काउंटीचे दृष्य

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,२९२ इतकी होती.[]

या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. १८०६-०८ दरम्यान स्पॅनिश भटक्या गॅब्रिएल मोरागा येथे आलेला असताना त्याला येथे अनेक मानवी कवट्या आढळल्या. १८३६मध्ये इतरांनाही अशाच कवट्या येथे सापडल्या. त्यावरून या प्रदेशातील नदीला त्यांनी रियो कॅलाव्हेरास (स्पॅनिशमध्ये कवट्यांची नदी) असे नाव दिले.[][][] कालांतराने या प्रदेशातील रचल्या गेलेल्या काउंटीला हेच नाव दिले गेले.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Calaveras County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Lyman, George D. John Marsh, Pioneer: The Life Story of a Trail-blazer on Six Frontiers, pp. 207–8, The Chautauqua Press, Chautauqua, New York, 1931.
  4. ^ Winkley, John W., Dr. John Marsh: Wilderness Scout, pp. 54–5, The Parthenon Press, Nashville, Tennessee, 1962.
  5. ^ Thompson, Thomas Hinkley, and West, Albert Augustus. History of San Joaquin County, California, p. 13, 1879.