कॅथरीन हेपबर्न
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.
(कॅथेरिन हेपबर्न या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅथरीन हॉटन हेपबर्न (Katharine Houghton Hepburn; १२ मे १९०७, हार्टफर्ड, कनेटिकट - २९ जून २००३) ही एक अमेरिकन सिने-अभिनेत्री होती. ६० वर्षांपेक्षा अधिक काळ हॉलिवूडमध्ये कार्यरत राहिलेल्या हेपबर्नने अनेक चित्रपटांमध्ये बहुरंगी भूमिका केल्या व तिला सर्वोत्तम अभिनेत्रीसाठीचे विक्रमी ४ ऑस्कर पुरस्कार मिळाले. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने १९९९ साली हेपबर्नला हॉलिवूडच्या इतिहासामधील सर्वोत्तम अभिनेत्री असा खिताब दिला.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कॅथरीन हेपबर्न चे पान (इंग्लिश मजकूर)