डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (४ मे, इ.स. १९५४; ३ मार्च, इ.स. २०१७:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत) हे: महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते सोळा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आले.

डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८०ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ला त्यांनी दलित शाहीर व त्यांची शाहिरी या विषयावर पीएच.डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२मध्ये ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे ते दोन वेळा प्रमुख होते. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचेही संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांनी योगदान केले. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे.

पैशाच्या देवघेवीवरून खून

संपादन

कृष्णा किरवले व सुतारकाम करणाऱ्या प्रीतम पाटील या दोघांतील वाद विकोपाला गेल्याने त्याने डॉ. किरवले यांचा त्यांच्या राहत्या घरी खून केला. त्या आरोपाखाली त्याला अटकही झाली आहे. या प्रकरणी प्रीतमची आई मंगला पाटील यांनी खुनातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केल्याने त्यांनाही सहआरोपी करून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी दिली.

डॉ. किरवले यांची नाशिक येथील मुक्त विद्यापीठात नियुक्ती झाल्याने ते कोल्हापुरातील रो बंगलो विकून पुण्याला जाणार होते. किरवले यांचे राजेंद्रनगर येथील राहते घर प्रीतम पाटील याने खरेदी केले होते. सहा महिन्यांपूर्वी किरवले यांनी याबाबतचा व्यवहार प्रीतमसह त्याच्या वडिलांशी केला होता. त्या वेळी घराची किंमत ४६ लाख रुपयांना ठरली होती. प्रीतमने किरवले यांना वेळोवेळी ३६ लाख रुपये दिले होते. मात्र किरवले आपणास २६ लाख रुपयेच मिळाल्याचे सांगत होते. या कारणातून प्रीतम व डॉ. किरवले यांच्यात वाद झाला होता. जानेवारीत डॉ. किरवले यांनी घराची किंमत आणखी २० लाख रुपयांनी वाढल्याचे प्रीतमला सांगितले. यातून या दोघांत वाद झाला.

२४-२-२०१७ रोजी डॉ. किरवले, गणपती पाटील, प्रीतम पाटील यांच्यामध्ये करार झाला. यामध्ये बाजारभावानुसार किरवले यांच्या बंगल्याची किंमत २३ लाख रुपये नमूद करण्यात आली होती. याच कारणातून सायंकाळी प्रीतम चर्चेसाठी किरवले यांच्या घरी गेला होता. बंगल्याच्या खरेदी रकमेतील फरक व व्यवहारातील वाढीव रक्कम यातून किरवले व प्रीतम यांच्यात वाद झाला. याच रागातून प्रीतमने किरवले यांच्यावर वार करून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.[]

३ मार्च २०१७ रोजी दुपारी चारच्या सुमारास प्रीतमने किरवलेंच्या घरी जाऊन चर्चा केली. मात्र वाद विकोपाला गेल्याने त्याने सुतारकामाच्या साहित्यातील एडक्याने किरवले यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अतिरक्तस्रावाने किरवले यांचा जागीच मृत्यू झाला.

सन्मान

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-06 रोजी पाहिले.