कृषी सहाय्यक
कृषी सहाय्यक हा राज्य प्रशासनाचा कृषी विकासासाठी काम करणारा गावातील घटक होय. त्याचे कार्यक्षेत्र साधारणत: २ ते ३ गावांपुरते मर्यादित असते. हा गाव पातळीवर कार्य करणारा कर्मचारी असून त्याच्यावर नजीकचे नियंत्रण मंडळ कृषी अधिकाऱ्याचे असते. सुधारित व संकरीत बी-बियाणांचा प्रचार व प्रसार करणे, शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, पाणलोट क्षेत्र विकास, मृद व जलसंवर्धन कार्यक्रम आणि कृषी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, आपत्कालीन सर्वेक्षण व मदत करणे, गावाचा वार्षिक कृषी आराखडा तयार करणे व तो ग्रामसभेत वाचणे, इत्यादी कामे कृषी सहाय्यक गाव पातळीवर करतो.[१]
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "Gatha Cognition". www.gathacognition.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-11 रोजी पाहिले.