कुरली धनचुवा (पक्षी)

पक्ष्यांच्या प्रजाती

कुरली धनचुवा किंवा कर्क धनचुवा (इंग्लिश:crab plover; गुजराती:करचला-खा) हा एक पक्षी आहे.

कुरली धनचुवा
कुरली धनचुवा

आकाराने गाव-तित्तरीपेक्षा मोठा असतो.वयात आलेल्या पक्ष्याच्या पिसांचा रंग पांढरा असतो.पाठ काळी असते.पंखाची किनार काळी असते.चोच काळी,पाय राखट रंगाचे असतात.

वितरण

संपादन

पाकिस्तान आणि भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे.पर्शियन आखातातील बेटावर मे-जून या काळात वीण

निवासस्थाने

संपादन

समुद्रकिनारे आणि बेटे.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली