किन्नोर
किन्नोर हे पर्यटन स्थळ हिमाचल प्रदेशात किन्नोर जिल्ह्यात आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहे सिमला शहरापासून सुमारे २५० कि.मी. अंतरावर आहे.येथून करछम, सांगला,कल्पा,रिकांग पिओ,काझा,कुनझुम पास मार्गाने लेहला जाता येते.
निसर्ग सौंदर्य
संपादनयेथे सगळीकडे सफरचंद,जर्दाळू च्या बागा असतात.इथला निसर्ग लहरी आणि रौद्र रूप धारण करणारा असतो.इथे आकाशाला भिडणारे प्रचंड कडे ढांग असतात आणि त्यामधून सतलज नदी वाहत असते.हा प्रदेश स्वर्गवत आहे आणि किन्नरांचा म्हणजे गंधर्व लोकांचा.इथे संस्कृतीवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. हा प्रदेश तिबेटला जवळ आहे.इथल्या प्रत्येक मंदिरावर झेंडा असतो.येथील देवळांना गुंफा म्हटले जाते.देवळात सुरेख चित्रे रेखाटलेली असतात.कल्पा वरून किन्नोर कैलास चे सुंदर दर्शन होते. किन्नोर कैलास पर्वत रांगेच्या पलीकडे सांगला,बाप्सा खोरी आहेत. सांगला हे ब्रुशहर साम्राज्याची राजधानी होते.इथे कामेरू किल्ला आणि कामाख्या देवी चे प्राचीन मंदिर आहे. चितकुल हे शेवटचे गाव चीन सीमेजवळ आहे.सराहन हे गाव भीमकाली या देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर पाच मजल्यांचे आहे.देवळाचे बांधकाम हिंदू आणि बौद्ध यांच्या मिश्र पद्धतीने केलेले आहे.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर २००२