संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते. संत सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत. त्यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदीरजवळ महाद्वार येथे आहे. [१]

संत काशीबा गुरव
संत काशीबा गुरव

संत सावता माळी यांनी गायलेले अभंग त्यांचे समवयस्क अरणभेंडी गावातील गुरव समाजाचे संत काशीबा गुरव यांनी लिपीबद्ध केले आहेत त्या वेळी काशीबा महाराज यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून केले आहे व समाज जागृती करून एक चांगला समतामय समाज निर्माण करण्याचे कार्य केले आहे श्री संत सावता माळी यांच्या गायलेल्या अभंगाचे लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून लिपीबद्ध केले यावरून त्यांनी लिहिण्या वाचण्याचे ज्ञान घेतले आहे हे सिद्ध होते.

संदर्भ संपादन

  1. ^ "संत काशिबा महाराज - sant sahitya" (इंग्रजी भाषेत). 2019-10-13. 2022-07-27 रोजी पाहिले.