काळा घोडा
काळा घोडा हा दक्षिण मुंबईतील एक चौक आहे. या चौकात इंग्लंडचा राजकुमार सातव्या एडवर्ड, याचा काळ्या घोड्यावर सवार असलेला पुतळा होता, त्यामुळे या चौकाला हे नाव मिळाले.
हा पुतळा आल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या दानशूर व्यावसायिकाने तयार करवून घेतला होता. १९६५मध्ये तो जिजामाता उद्यानाच्या दर्शनी भागात हलविण्यात आला.