काळभैरवनाथ मंदिर (आगडगाव)

अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही. हे मंदिर मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले आहे. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.[ संदर्भ हवा ]

काळभैरवनाथ
भाषा मराठी
कार्यक्षेत्र आगडगाव, महाराष्ट्र

कालभैरव मंदिरातील सेवा

संपादन

नित्य पूजा-विधी

संपादन

उत्सव

संपादन

भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात.[ संदर्भ हवा ] ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात १० काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.[ संदर्भ हवा ]

चित्रपट

संपादन

छायाचित्र

संपादन
  1. श्री काळभैरवनाथ, आगडगाव

अन्नदान

संपादन

देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक रविवारी मोफत जेवण दिले जाते.[ संदर्भ हवा ] बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात, मिरचीचा ठेचा असे या जेवणाचे स्वरूप असते.

कसे जाल

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्यदुवा

संपादन