कालबेलिया हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकनृत्य प्रकार आहे.[] युनेस्को वारसा यादीत याचा समावेश झालेला आहे.राजस्थान येथील सापाचे खेळ सादर करीत असलेल्या गारुडी जमातीतील स्त्री आणि पुरुष सदस्य हा कलाप्रकार सादर करतात.

कालबेलिया नृत्य

परंपरा

संपादन

नवनाथ संप्रदायातील कानिफनाथ यांच्याशी या संप्रदायाचा संबंध मानला जातो.[] कानिफनाथ यांना विषारी सर्प आणि प्राणी यांच्यावर नियंत्रण करण्याची शक्ती प्राप्त होती आणि ते विष पचवू शकत अशी श्रद्धा मानली जाते.

कालबेलिया जमात ही भ्टकी जमात मानली जाते.पामुख्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या जमातीतील माणसे स्थलांतर करताना दिसतात. सापाचे विष विकणे हा त्यांचा प्रमुख उद्योग असून साप, कुत्रा,कोंबड्या, गाढव,डुक्कर या प्राण्यांच्या पालनाचा व्यवसाय या जमातीतील लोक करतात. यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या नृत्यात पडलेले असल्याने त्याच्या नृत्य हालचाली या सर्पाच्या हालचालीही मिलत्याजुळत्या असतात असे दिसून येते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Kalbelia Folk Dances of Rajasthan, Indian Folk Dances,Folk Dances of India". www.indianfolkdances.com. 2023-07-14 रोजी पाहिले.
  2. ^ Singh, Dr Jayram; Singh, Prof N. B. (2019-09-09). Nath Panth Aur Guru Gorakshnath (हिंदी भाषेत). Educreation Publishing.
  3. ^ "UNESCO - Kalbelia folk songs and dances of Rajasthan". ich.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2023-07-14 रोजी पाहिले.