कार्बनची अपरूपे

केवळ कार्बनपासून बनलेले पदार्थ


कार्बनची इतर कार्बन अणूबरोबर संयोग पावण्याची क्षमता -संयुजा- खूप चांगली असल्याने कार्बन या मूलद्रव्याच्या अणूंपासून वेगवेळ्या तापमानानुसार आणि दबावानुसार वेगवेगळ्या रूपातले पदार्थ बनतात. अशा पदार्थांना कार्बनची अपरूपे म्हणतात.

कार्बनची ८ अपरूपे :- (a) हिरा (diamond), (b) ग्रॅफाईट, (c) लोन्सडलीट, (d) C60 बक-मिनिस्टर-फुलेरीन, (e) C540, फुलेराईट (f) C70, (g) अस्फटिक कार्बन, आणि (h) एकस्तरीय नॅनो ट्यूब

कार्बनची चित्रांत दाखविलेली आठ अपरूपे शेकडो वर्षांपासून ज्ञात असली तरी, अजूनही कार्बनच्या नव्या नव्या अपरूपांचा शोध लागत असतो.