कार्नेलिया सोराबजी

Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


कार्नेलिया यांचे पदवीधर होण्याचे स्वप्न होते. कार्नेलिया यांच्या वडिलांनी प्रोत्साहन होते. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास होऊन विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या कार्नेलिया ह्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महिला होती. कार्नेलिया यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तीनशे विद्यार्थ्यांमध्ये त्या एक विद्यार्थिनी होत्या. पहिल्या वर्षी सर्वात जास्त गुन मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी असणारी हुग्लिंग शिष्यवृत्ती कार्नेलिया यांनी मिळवली, हॅवलॉक परितोषिकही त्यांनी मिळविले. इ.स. १८८७ मध्ये त्या B. A. ची परीक्षा प्रथमवर्गात पास झाल्या. प्रथमवर्ग मिळविणा-या डेक्कन कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांमध्ये एक कार्नेलिया ह्या होत्या . डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.[१]

कार्नेलिया सोराबजी
जन्म इ.स. १८६६
मृत्यू इ.स. १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
वडील सोराबजी खरसेटजी


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


व्यतिगत माहितीसंपादन करा

गुजराथ कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या फेलो पदासाठी तिला निमंत्रित केले. तेव्हा म्हटले, पुन्हा बोलाविले. तेव्हा तिने फेलो म्हणून काम करण्याचे "तीन महिन्यांनी इंग्रजीची प्राध्यापक म्हणून तिची नेमणूक झाली. पुरुषप्रधान महाविद्यालयात शिकविणारी कानेलिया ही पहिली स्त्री व्याख्याता होती. फस्त बी.ए. होण्यावर तिचे समाधान होईना, इंग्लंडला जाऊन कायद्याचे विचार तिच्या मनात घोळू लागले. इंग्लंडमधील विद्यापीठात तिने अर्ज केला.

इंग्लंड दौरासंपादन करा

१८८९ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कार्नेलिया सोराबजी ऑक्सफर्ड येथे गेली. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेणारी कार्नेलिया सोराबजी पहिली स्त्री होती. परीक्षेच्या सभागृहात पुरुषाबरोबर बसून परीक्षा देण्याची तिला परवानगी दिली नाही. परीक्षा पास होऊन तिला कायद्याची पदवी मिळाली परंतु वकिलीचा पेशा तिला स्वीकारता येईना. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणीपर्यंत कार्नेलियाचे नाव पोचले. भारतातून आलेल्या या स्त्रीला बघण्याची उत्सुकता राणीच्या मनात निर्माण झाली. कार्नेलियाला राणीने भेटीला बोलावले. भारतीय स्त्रीच्या 'साडी' या पेहरावात कार्नेलिया व्हिक्टोरिया राणीला भेटली. इ.स.१८९४ मध्ये कार्नेलिया भारतात परत आली.

कामाचे स्वरूपसंपादन करा

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेऊनही भारतात वकिली करण्यासाठी बॅचलर ऑफ लॉ L.L.B. ची पदवी तिने घेणे गरजेचे होते. ते शिक्षणही तिने घेतले. परंतु १९१९ मध्ये सेक्स डिक्स क्वालिफिकेशन रिमूव्हल ॲंक्ट मान्य होईपर्यंत कार्नेलियाला वकिली करता आली नाही. १९०४ पासून सरकारने एक महत्त्वाचे काम तिच्यावर सोपविले होते. बंगाल, बिहार, ओरिसा येथील पडदानशीन स्त्रियांची कायदेविषयक सल्लागार म्हणून तिने ते काम तीस वर्षे (३० वर्षे) सातत्याने केले. १९०९ मध्ये सरकारने ‘कैसर ए हिंद' या सुवर्णपदकाने कार्नेलियाला सन्मानित केले. आपल्या अनुभवाच्या आधारे कायदेविषयक अनेक महत्त्वाची पुस्तके तिने लिहिली. निवृत्तीनंतर कार्नेलिया इंग्लंडमध्ये स्थायिक झाली. वयाच्या ८८व्या वर्षी इंग्लंडमध्येच तिचे निधन झाले.

हे ही पहासंपादन करा

कैसर-ए-हिंद

बाह्यदुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ७०. ISBN 978-81-7425-310-1.