कार्तिक शुद्ध एकादशी
कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे.[१] कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.[२]
प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.
वारकरी संप्रदाय
संपादनकार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते.[३] वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात.
आवळी भोजन
संपादनआवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल.[४] या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.
हे ही पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ साळगावकर, जयंत. "प्रबोधिनी एकादशी". कालनिर्णय.
|archive-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Manglik Dosh Karan Va Nivaran (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788128809934.
- ^ Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
- ^ Miśra, Dayānidhi (2015). Lok Aur Shastra: Anwaya Aur Samanwaya (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350729960.